You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी निवडणूक लढवण्यास इच्छुक

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी निवडणूक लढवण्यास इच्छुक

*फोंडाघाट*

फोंडाघाट ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. काही प्रभागात उमेदवार निश्चित झाले असून काही प्रभागात चाचपणी प्रत्येक पक्षाची सुरू आहे.आता यामध्ये इच्छुक उमेदवारांत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे फोंडाघाट वाॅर्ड नंबर २ आणि वाॅर्ड नंबर ३ मधुन उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक आहेत.

अजित नाडकर्णी या अगोदर २ टर्म ग्रामपंचायत सदस्य म्हणुन काम केले आहे. भा.ज.प. कडुन उमेदावारी मिळाली तर निवडणुक लढवण्याचे ठरवले आहे.जर उमेदवारी मिळाली नाही, तरी पक्ष आदेश असेल तो आपल्याला मान्य असेल. मी आमदार नितेश राणे यांचा कार्यकर्ता आहे, त्यांच्या निर्णयांचा सन्मानच होईल असे नाडकर्णी यांनी सांगितले.

*अजित राधाकृष्ण नाडकर्णी यांचा अल्प परिचय*
▪️विशेष कार्यकारी अधिकारी
▪️माजी सदस्य : ग्रामपंचायत फोंडाघाट वॉर्ड नं. 2
▪️माजी संचालक – अर्बन बँक
▪️माजी संचालक : फाँडाघाट एज्युकेशन सोसायटी
▪️माजी सदस्य : कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली

प्रतिक्रिया व्यक्त करा