You are currently viewing शेर्ले सिद्धार्थनगर येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

शेर्ले सिद्धार्थनगर येथील कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

बांदा

शेर्ले-सिद्धार्थनगर मधील कार्यकर्त्यांनी आज माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरपंच उदय धुरी यांच्या उपस्थितीत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप पक्षाचे कार्य आणि धोरण तसेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरीत होवून या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनी सांगितले.


यावेळी बूथ अध्यक्ष शाम सावंत, अजित शेर्लेकर, बांदा मागास सेल उपाध्यक्ष राजेश चव्हाण, दयानंद धुरी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्राजल प्रशांत जाधव, लक्ष्मण जाधव, रामदास जाधव, शंकर जाधव, प्रशांत जाधव, नारायण जाधव, नयना जाधव, प्रिया शेर्लेकर, प्रदिप जाधव, सुषमा जाधव, राजन जाधव, प्रथमेश जाधव, आरती जाधव, प्रदिप जाधव, सुबमा जाधव, गिरीजा जाधव, राधाबाई जाधव, रविंद्र जाधव, सविता ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यानी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी श्री पेडणेकर म्हणाले गेली दहा वर्षे सरपंच उदय धुरी यांनी शेर्ले गावाच्या विकासासाठी सहकाऱ्याना सोबात घेवून काम केले आज आपल्या सिद्धार्थ नगर मधिल महिलेला sherle गावचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळणार आहे. आपला सर्वांचा सर्वगीण विकासासाठी भाजप पक्ष नेहमी आपल्या पाठीशी राहील. यावेळी सरपंच धुरी यांनी आपणाला सर्व सहकार्य भाजपच्या माध्यमातून होईल. शेर्ले गावच्या विकासासाठी आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी आहोत. मंडल अध्यक्ष श्री धुरी यांनी भाजपची सत्ता आज केंद्रात राज्यात आहे. गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकजूटीने कार्य करूया असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा