सावंतवाडी :
सरमळे नजीक नेवली ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला रविवार 20 नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाची स्वागत मंगळवार 22 नोव्हेंबरला होणार आहे. रविवार 20 नोव्हेंबर ला सात प्रकाराच्या हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. या निमित्त सरमळे परिसरातील भजन मंडळे आपली सेवा माऊली चरणी अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी या सप्ताहाची सांगता होणार आहे. मंगळवार 22 नोव्हेंबरला नेवली ग्रामदैवत श्री माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर जय हनुमान दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.