कणकवली
पुणे येथून निघालेल्या आणि गोवा येथे जाणाऱ्या ३० हुन अधिक मोटार सायकल स्वारांच्या ताफ्यातील एका मोटारसायकल स्वाराचा कणकवली वागदे पेट्रोलपंपानजीक असलेल्या वळणावर दुभाजकावर आदळून मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्याहून गोव्याकडे एका कार्यक्रमासाठी ३२ ते ३५ जणांचा बुलेट रॉयल एनफिल्ड कंपनीच्या गाड्यांचा ताफा जात होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिषेक देसाई वय २२ रा. पुणे अस मृत युवकाच नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ५:३० वा. हा अपघात घडला. गाडी क्रमांक एम. एच. १२ टी. एम. ८७०३ घेऊन तो गोव्याच्या दिशेने चालला होता. वागदे येथे आला असता पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर रस्त्याच्या बाजूच्या दुभाजकावर मोटारसायकल आदळली व डोक्याला मार लागल्याने दुदैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, दीपक मेस्त्री होमगार्ड, नितेश गुरव, सिद्धेश पाटील, हायवे ट्राफिकचे देवानंद मिटबावकर घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सूरु होते.