You are currently viewing काळभैरव जयंती निमित्त”

काळभैरव जयंती निमित्त”

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*

*”काळभैरव जयंती निमित्त”*

काळभैरवाचे करू स्मरण गुणगान
सर्व दोष दूर करील होईल कल्याण।।ध्रु।।

काळभैरवाला काळ वेळ राहे आधीन
शिवाची प्रलयकारी शक्ती राहे बनून
हर युगाचा अंत करणारा सामर्थ्यवान।।1।।

श्याम वर्णीचे करती कार्यारंभी स्मरण
रुद्र आदिपुरुष सिद्ध योगी असाधारण
सद्गुरुदासांसाठी प्रेमळ भक्त परायण।।2।।

सामर्थ्य देई जीवनाचा विशाल दृष्टिकोन
कठीण कार्यात यश देई तो सहजतेनं
काळभैरव तत्व सद्गुरु त्यास आधीन।।3।।

भैरवा चा जप करिता लक्ष्मी होई प्रसन्न
ओम काळभैरवाय नमः नित्य करावे पठण
चैतन्य स्फुलिंग देई नैराश्य दूर करून।।4।।

शनि काळभैरवा चा श्रेष्ठ भक्त जाणं
पारदर्शी समतोल विघ्नहार सत्यवान
सूक्ष्म देहातील वासना कर्म करी हीन।।5।।

कर्म-अकर्मातून मुक्त करी देह बलवान
मुक्त करी मायावी अंतरिक्ष चक्रातून
काळभैरव पाताळ वासी दक्षिणेश्वरी राहुन।।6।।

सर्व नक्षत्रे त्याच्या असतात आधीन
काळभैरव सर्वांचे करी गर्वहरण
मोक्षप्राप्ती साठी सहाय्य करी मार्गदर्शन।।7।।

काळभैरवा ची सेवा शिवोपासना समान
पंचमहाभुतांवर ठेवी तो नियंत्रण
चंचलता करी दूर संकटी येई धावून।।8।।

श्री काळ बटुक स्वरणाकर्षण स्मशान
मार्तंड कपाळ चंड संहार क्रोध नग्न
रूरु एकादश नामे भैरव करि धारण।।9।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन 410 201.
Cell.9373811677.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा