कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या उपस्थितीत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली मधील अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. किरण सामंत यांच्या उपस्थितीत या प्रवेश कर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पांडुरंग मेस्त्री, पंढरीनाथ गुरव, चिंतामणी मडव , भानुदास कुंभार ,विनायक कोकरे,नंदराज दळवी, दत्ताराम सावंत ,भाई पावस्कर, वैभव कांबळे, आदींनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी किरण सामंत आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी जि प सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, शेखर राणे, भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, दिलीप घाडीगावकर, प्रमोद सांगवेकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.