You are currently viewing ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्धार

ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात निर्धार

प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करूनच पुढील निर्णय; जिल्हाध्यक्ष राजन तेलींचे स्पष्टीकरण…

सावंतवाडी

आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आजच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रदेश कार्यकारणीचे लक्ष वेधून पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे मांडली. दरम्यान प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमचा पक्ष वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी सुद्धा कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी विकास कामे करण्या बरोबरच संघटना वाढविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली बोलत होते.


यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, महेश धुरी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा