You are currently viewing भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम’ (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न

भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम’ (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न

सिव्हिल विभागाचे आयोजन

सावंतवाडी 

येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्युकेशन प्रोग्रॅम’ (CEP) अंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गात आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील बिल्डिंग मेंटेनन्स या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव श्री.संजीव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरपीडीचे प्रा.नवनाथ सावंत, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये, सिव्हिल विभागाचे प्रा.प्रसाद मणेरीकर, प्रा. हवाबी शेख उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण सत्रात विद्यार्थ्यांना सर्व्हे, काँक्रीट टेक्नॉलॉजी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन, इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग यासोबतच मटेरियल टेस्टिंग लॅब इ. विषयांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. प्रशिक्षण वर्गात एकूण 27 विद्यार्थी सहभागी झाले होते.

बांधकाम क्षेत्रातील महत्वपूर्ण विषयांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना अनुभवता आल्यामुळे त्यांच्या ज्ञानात चांगली भर पडेल असा विश्वास प्रा. नवनाथ सावंत यांनी वर्गाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला तसेच सिव्हिल विभागाच्या सहकार्याबद्दल आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा