दोडामार्ग
दोडामार्ग येथील बाजारपेठेतील बाजारपेठेतील वक्रतुंड मित्रमंडळाच्यावतीने आयोजित नवयुवक दोडामार्ग आयडॉल स्पर्धेचा मानकरी गोवा येथील जतीन च्यारी ठरला . द्वितीय अनुष्का थळी , तृतीय ओंकार शिरवईकर , उत्तेजनार्थ शुभम नाईक , शिवम गोसावी , हर्षद मेस्त्री यांनी तर स्थानिक उत्तेजनार्थ पारितोषिक उदय हेरेकर यांनी प्राप्त केले .
गणेश मेस्त्री , तृप्ती दामले – कुडाळकर यांनीही आपल्या सुमधुर गायनातून रसिकांची मने जिंकली . परीक्षक म्हणून राज मडगावकर , तृप्ती दामले – कुडाळकर , नंदकुमार चांदेलकर यांनी काम पाहिले . आयडॉल स्पर्धेत एकूण ४० स्पधर्कांनी भाग घेतला होता . गोवा , सिंधदुर्ग , कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले होते . शेवटी जतीन च्यारी यांनी बाजी मारली . पहाटे ५.४५ वा . निवड जाहीर झाली . उद्घाटन भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते झाले . यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष चेतन चव्हाण , उपनगराध्यक्ष देविदास गवस , उद्योजक विवेकानंद नाईक , पं . स . चे माजी सदस्य बाळा नाईक , भेडशी येथील उद्योजक बाबा टोपले , अॅड . संतोष सूर्यरावत , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर , नगरसेवक गौरी पार्सेकर , ज्योती जाधव , क्रांती जाधव , सुकन्या पनवेलकर , वासंती मयेकर , स्वराली गवस , संजना म्हावळणकर , चंदन गावकर , रामचंद्र मणेरीकर यांच्यासह मनोज पार्सेकर , समीर रेडकर , बाबुश फुलारी , विशाल मणेरीकर , प्रकाश सावंत आदी उपस्थित होते .
यावेळी परब म्हणाले , दोडामार्ग शहरासोबत संपूर्ण तालुक्याचे स्पिरिट म्हणून नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची साऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळख आहे . ते लक्षात घेता चव्हाण यांना उज्वल राजकीय भवितव्य आहे . त्यांनी आपल्या कार्यातून भाजपचे नाव दोडामार्ग शहरासोबत तालुक्यातील गावागावामध्ये पोहचावे , असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले .
लवकरच दोडामार्ग महोत्सव – चव्हाण
यावेळी नगराध्यक्ष चव्हाण म्हणाले , शहरात लवकरच दोडामार्ग महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे . यामध्ये स्थानिक कलाकारांना विशेष वाव दिला जाणार आहे . तसेच क्रीडासंकुल , कला व सांस्कृतिक भवन उभारण्याकडेही आपला कल राहील , असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले . यावेळी विवेकानंद नाईक , बाळा नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मनोज पार्सेकर यांनी केले . सूत्रसंचालन सुमित दळवी तर आभार सुदेश मळीक यांनी मानले . यावेळी अनेक स्तरातील व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.