वाईल्ड कोकण संस्थेतर्फे पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन
सावंतवाडी
माजगाव येथे केलेल्या पक्षी निरीक्षणात तब्बल ४० वेगवेगळे पक्षी आढळून आले आहेत. यात मलबार राखी धनेश, नारंगी गोमेट, खाटीक, हळद्या, कोतवाल आदी पक्ष्याचा समावेश आहे. वाईल्ड कोकणच्या माध्यमातून पक्षी सप्ताहानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन उपस्थित पक्षीप्रेमींकडून करण्यात आले.
याप्रसंगी डीएफओ सुभाष पुराणिक, वाईल्ड कोकण संस्थेचे अध्यक्ष धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष सुभाष गोवेकर, डॉ. गणेश मर्गज, महेंद्र पटेकर, नंदन बिरोडकर, डॉ. दीपक तुपकर, भरत गावडे, अमोल काळे, दिलीप भाईप, प्रथमेश ओटवणेकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वप्नील गोसावी, ओंकार आयरेकर, कॉर्बेट फाऊंडेशनचे दीपक कदम, अक्षय दळवी, अतिश माईणकर, मैथिली पटेकर, अथर्व खाडिलकर आदी पक्षीमित्र उपस्थित होते.