You are currently viewing अण्णा केसरकर यांच्या स्मरण साखळी पुस्तकाचे प्रकाशन

अण्णा केसरकर यांच्या स्मरण साखळी पुस्तकाचे प्रकाशन

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, माजी आ शंकर कांबळी यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी

शिवसेनेचा जन्म ते आज पर्यंतचा प्रवास, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून लढण्यात आलेले लढे आणि जीवनातील अनेक चढ उतारांची यशोगाथा सांगणार्‍या सावंतवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्या “स्मरण साखळी” पुस्तकाचे प्रकाशन आज माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार शंकर कांबळी यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, राजमाता शुभदा देवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर , जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, राष्ट्रीय मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक,राजेश मोंडकर, पंढरी परब, प्रवीण मांजरेकर.जी.ए बुवा सर यांच्यासह पत्रकार व सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा