You are currently viewing गझल

गझल

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम मोरे लिखीत अप्रतिम गझल रचना*

*गझल*

मती विषारी वाटत आहे
शब्द जिव्हारी लागत आहे

दगडविटांचे देव जाहले
माणूस मात्र नासत आहे

घरात रडते बाळ उपाशी
माय फडावर नाचत आहे

वाल्मीकीचा होतो वाल्या
पाप एेवढे वाढत आहे

स्वार्थ साधण्या लावालावी
लबाड वृत्ती वाढत आहे

बोज्यात कैद शेत उतारा
शेतकऱ्याला गाडत आहे

असे पूज्य जी ग्रंथामध्ये
नार जगी ती बाटत आहे

जयराम मोरे सोनगीर
७७०९५६५९५७

 

प्रतिक्रिया व्यक्त करा