सावंतवाडी :
वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सावंतवाडी विज वितरण कंपनीच्या माध्यमातून येथील श्रीराम वाचन मंदिरामध्ये बुधवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजता विज ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी विज बिलाबाबतच्या तक्रारी बंद असलेले पथदिप, वाढीव विजबीले, कमी दाबाचा विज पुरवठा, महावितरणच्या विविध योजना यावर चर्चा होणार आहे. यावेळी सर्व ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदिश मांजरेकर, ग्राहक पंचायत अध्यक्ष अनंत नाईक, जिल्हा घ व्यापारी संघ अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी केले आहे.