बांदा
इन्सुली दुग्ध संस्थेच्या चेअरमन पदी गुरुनाथ पेडणेकर तर व्हाईस चेअरमन पदी सहदेव सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. सन २०२२ – २८ या कालावधीसाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली होती. आज निवडणूक अधिकारी एम. एस. धुमाळ यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेतली.
संस्थेचे चेअरमन म्हणून गुरुनाथ पेडणेकर तर व्हाईस चेअरमन पदी सहदेव सावंत यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत, विद्या विकास मंडळ सचिव विकास केरकर, अध्यक्ष उमेश पेडणेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी अशोक सावंत यांनी संस्थेचे संचालक गेली आठ वर्षे करीत असलेले कार्य इन्सुली गावासाठी अभिमानाची बाब आहे. गावात दुध गंगा येण्यासाठी सर्वानी एकजुटीने काम करणे आवश्यक आल्याचे सांगितले.
नूतन चेअरमन पेडणेकर यांनी इन्सुली गावातील शेतकर्यांनी दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी दुध व्यवसायाकडे शेती पूरक म्हणून न पाहता व्यावसायिक बनावे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांना विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा करून घेवून आपली आर्थिक उन्नती साधावी. यासाठी संख्येच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी विकास केरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विकास सोसायटी संचालक शांताराम बांदिवडेकर, साबाजी परब, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, सुधीर गावडे, संस्था सचिव संजय सावंत, संचालक महेंद्र पालव, सखाराम बागवे, विलास गावडे, विसोबा पालव, भागू पाटील, सुहानी गावडे, गितांजली हळदणकर, सेल्समन महादेव मेस्त्री, अशोक पडवळ आदी उपस्थित होते.