You are currently viewing मालवण खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व…

मालवण खरेदी विक्री संघावर भाजप पुरस्कृत पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व…

महाविकास आघाडी पॅनेलला धोबीपछाड ; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकच जल्लोष…

मालवण

येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रतिष्ठेच्या बनविलेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सावंतवाडी पाठोपाठ भाजप पुरस्कृत पॅनेलने महाविकास आघाडी पॅनेलला धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला. सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय मिळवित खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व राखले.
तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज येथील टोपीवाला हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात १२५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या उपस्थितीत सुरवात झाली.
सुरवातीपासूनच भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. भाजप पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनेलमधील संस्था मतदार संघ- कृष्णा चव्हाण (विजयी), राजन गावकर (विजयी), महेश मांजरेकर (विजयी), प्रफुल्ल प्रभू (विजयी), अभय प्रभूदेसाई (विजयी), राजेंद्र प्रभूदेसाई (विजयी), भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्ग- अशोक तोडणकर (विजयी), इतर मागास प्रवर्ग- कृष्णा ढोलम (विजयी), अनुसूचित जाती जमाती- सुरेश चौकेकर (विजयी), महिला मतदार संघ- सरोज परब (विजयी), अमृता सावंत (विजयी), व्यक्ती मतदार संघ- विजय ढोलम (विजयी), महेश गावकर (विजयी), गोविंद गावडे (विजयी), रमेश हडकर (विजयी)
या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेल मधील संस्था मतदार संघ- श्रीकांत बागवे, अरुण भोगले, उदय दुखंडे, सदाशिव महाभोज, विठ्ठल नाईक, व्यक्ती सदस्य मतदार संघ- महेश अंधारी, मनोज लुडबे, चंदन पांगे, मनोज राऊत, महिला मतदार संघ- साक्षी लुडबे, नीना मुंबरकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग- मेघनाद धुरी, इतर मागास प्रवर्ग- सुभाष तळवडेकर, अनुसूचित जाती जमाती- नागेश अटक, व्यक्ती मतदार संघ- संतोष लुडबे, देवानंद लुडबे या अपक्षांचाही पराभव झाला.
तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहीले होते. यात भाजप पुरस्कृत पॅनेलने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा