गेले दिड महिना सुरू असलेल्या ‘मनसे’च्या आंदोलनाला यश आल्याची विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांची माहिती..
मुंबई :
राजाराणी मल्होत्रा विद्यालयातील आरटीई व इतर शेकडो विद्यार्थ्यांचे १० ऑगस्ट पासुन बंद असलेले ऑनलाईन शिक्षण आता सुरू झाले आहे. ‘मनसे’च्या शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मनसेच्या आंदोलनाला यश आल्याची माहिती ओशिवरा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, शिक्षणविभाग व पोलिस प्रशासन यांना रीतसर तक्रार देऊन पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त अभीषेक त्रीमुखे, शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्या समोर विद्यार्थ्यांची ठामपणे बाजु मांडुन १३०० विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. त्या बद्दल पोलिस प्रशासनाचे व शिक्षणविभाग मनापासून आभार श्री. संदेश देसाई यांनी व्यक्त केले.
दरम्यान या आंदोलनात मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ठामपणे उभ्या राहाणाऱ्या सौ. शालिनीताई ठाकरे यांचे व ओशिवरा पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पालक आणि सर्व मनसे कार्यकर्ते यांचेही मन:पुर्वक आभार श्री. संदेश देसाई यांनी मानले आहेत.