You are currently viewing सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये १३६ प्रकरणे निकाली

सावंतवाडीतील लोकअदालतीमध्ये १३६ प्रकरणे निकाली

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण १३६ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली त्यातून ३१ लाख ६ हजार २५९ रूपये वसुल करण्यात आले. आज एकूण १५८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर व वेंगुर्ले सह. दिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकअदालत उ झाले. यावेळी वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. पी.डी. देसाई पॅनेल समिती सदस्य ॲड. जी. जी. बांदेकर व ॲड. स्वप्नील कोलगांवकर , सहाय्यक अधीक्षक प्रशासन स्नेहा सावंत उपस्थित होते.

वादपूर्व प्रकरणे १०२१ ठेवणेत आली होती. त्यापैकी ९३ प्रकरणे निकाली होवून ८ लाख ९२ हजार १९९ रूपये रक्कम वसूल झाली.

न्यायालयीन प्रलंबित ५६४ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी ४३ प्रकरणे निकाली होवून २२ लाख १४ हजार ६० रूपये रक्कम वसूल झाली.लोकन्यायालय यशस्वी करणेसाठी न्यायालयाचे सहा अधिक्षक, श्रीमती. एन. एस. सावंत व श्री. एस्.एस्. सबनीस, तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपीक श्रीमती. व्ही. एम. मीर आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा