*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह सदस्य…लालित्य नक्षत्रवेल… श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*
*वृत्त आनंदकंद*
(लघु-गुरू सूट)
*हळवा ऋतू बहरतो*
मोहोरल्या कळ्यांनी हळवा ऋतू बहरतो
पानाफुलांत सजुनी ओल्या दवांत न्हातो
वेडात लालचाफा खडकात रुजुन येतो
येता वसंत सारी पाने गळून फुलतो
गंधाळल्या फुलांनी का हृदयनाद जडतो
सूर्यास्त वेळ येता प्रणयास रंग चढतो
भेटून सांजवेळी लज्जेत चूर होतो
प्रेमात धुंद होता रात्रीस स्वप्न बनतो
नजरेत का तुलाही शृंगार भाव दिसले
ओढून पास तेव्हा अधरांस तृप्त केले
येता मिठीत सजणी श्वासात श्वास विरले
अलवार भावनांनी गाली गुलाब फुलले
【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६