*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री आशा भावसार लिखीत अप्रतिम लेख*
*तुझ्या आठवांचं गोंदण उरलयं….!*
प्यार मे दिल दे दिया मैने तुझको दिल जाना… दिवाना मैं दिवाना….हे गीत गुणगुणत तो राजबिंडा, उंच शरीर यष्टी, गोरा गोमटा, रुबाबदार काळ्याभोर केसांचा उंच छान भाग असलेला, सुहास्य वदनी नवतरुण …कॉलेज बॉय … डोळ्यात नवीन आयुष्याची सोनेरी स्वप्नांची चमक घेऊन… कॉलेज संपताना स्नेहसंमेलनाची तयारी करत असताना…. मैत्रिणी मित्र-मैत्रिणीच्या सोबतीत मौजमजेतील तो दिवस …. नव तारुण्यातील तो मोरपंखी दिवस …. स्वप्नांच्या सप्तरंगी झुल्यात झुलताना जीवनाला प्रेमाची झालर विणण्यास उत्सुक…. अन् त्याच क्षणी वार्याच्या झुळके प्रमाणे हळूच प्रेमाची झुळूक पारिजातकाच्या सुगंधापरी मनात लहर उठवून गेली…. ती झुळूक म्हणजे नवतारुण्यानी मोहरलेली जणू मोगर्याची अबोल कळी, कोमलांगी, चंचल मृगनयनी, स्मितहास्यवदनी….मनमोहिनी… ओष्ट पाकळी जणू गुलाब कुपी… कुंतलात माळलेला तो श्वेतवर्णी गजरा आणि तीच्या गालावरची ती खळी… घायाळ करून गेली त्या नवतरुणास…. त्या दिवसापासून तो पुरता तिचा दिवाना झाला…त्याच्या अंतरंगात जणू प्रेमरूपी गुलाबाची उधळण सुरू झाली…रात्रंदिवस तो तिच्या प्रेमात फक्त..तिच्या प्रेमातच.. तिच्या सहवासात धुंद…. तिच्या जवळून येण्या जाण्यानेही त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती ..पण एक दिवस त्याच्या प्रेमाच्या चंदेरी सोनेरी किरणांनी तिला मोहविलेच..आणि त्याची अन् तिची नजरा नजर होताच त्याला तिचा होकार कळला.. मग सुरू झाली ती प्रेम कहानी… त्या प्रेम कहाणीला साक्ष असणारा तो सागर किनारा,ती मोहक संध्याकाळ, ती रुपेरी वाळू अन् त्या रुपेरी वाळूवर सहजच कोरलेली दोघांची नावे …तो माळवतीचा नजारा हे सर्व त्यांना हवे हवेसे वाटू लागले… तीही केव्हा त्याच्या प्रेमपाशात कैद झाली हे तिलाच कळले नाही… ती त्याच्या सवे रात्र न् रात्र चांदण्याच्या मैफिलीत प्रणय वेड्या निशाच्या साथीने त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली.. अन् अचानक त्याला आर्मीच्या भरतीचा कॉल आला आणि तो उज्वल भविष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी भारतमातेच्या रक्षणार्थ सीमेवर हजर झाला…. आणि ती मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या प्रियकराला निरोप देत राहिली…. अन् हृदयातून आर्त साद घालीत … शेवटी आठवांची शिदोरी हृदयाच्या बंद कप्प्यात ठेवत म्हणत होती… *तुझ्या आठवाचं गोंदण उरलयं…!*
*फक्त तुझ्या आठवाचं गोंदण उरलयं….!*
*सौ. आशा सचिन भावसार जालना.*