You are currently viewing १२० एचपी वरील नौकांना डिझेल परतावा न मिळाल्यास उपोषण

१२० एचपी वरील नौकांना डिझेल परतावा न मिळाल्यास उपोषण

देवगड

देवगडातील मच्छीमारांच्या ‘१२० एचपी वरील डिझेल कोटा अदा करण्याबाबत व डिझेल विक्री कर परतावा वितरित करण्याबाबतच्या मंजुरीचे पत्र मच्छीमारांना न मिळाल्यास २२ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून देवगड मासळी लिलाव केंद्रासमोरील समुद्रात (जेटी) बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संबंधित मच्छीमार, नौकामालक व संस्था प्रतिनिधींनी मत्स्य व्यवसाय आयुक्त, मालवण यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

देवगड फिशरमेन्स को. ऑपरेटिव्ह सोसायटीत १२० एचपीवरील नौकामालक, देवगडमधील सर्व
मच्छीमार व संस्था प्रतिनिधींची संयुक्त नौकांचा सभा गुरुवारी आयोजित केली होती. या सभेत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त देवरे यांनी दिलेल्या पत्रावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार २१ नोव्हेंबरपर्यंत शासनास मुदत देऊन सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, नौकांचा डिझेल कोटा अदा करण्याबाबत व डिझेल विक्री कर परतावा वितरित करण्याबाबतच्या मंजुरीचे पत्र मच्छीमारांना न मिळाल्यास समुद्रात बेमुदत उपोषण करण्यात येईल. या निवेदनावर जगन्नाथ कोयंडे, विनायक प्रभू श्रीपाद पारकर, उमेश आंबेरकर, राहुल मुणगेकर, शामराव पाटील, कृष्णा परब आदींच्या सह्या आहेत,

 

प्रतिक्रिया व्यक्त करा