*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कैद झाले जीवन*
हिरव्यागार पोपटाची
चोच होती लाल
विडा खाऊन त्याचे
फुगले होते गाल
विठू विठू बोलून तो
भविष्यवाणी करायचा
खोटे बोलून ज्योतिषबुवा
पोट आपले भरायचा
गोड मधाळ बोलणे
त्याचे त्यालाच नडले
पिंजर्यातले जीवन
अंगवळणी पडले
ढोंगी ज्योतिष बुवाकडे
मांडत लोक व्यथा
निळ्या कंठात दाटली
पोपटाची करुण कथा
लोखंडाच्या पिंजर्यात
झाले कैद जीवन
विशाल नभाकडे पाहून
होते दुःखी पोपटाचे मन
*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ, *सिंधुदुर्ग*