विश्व हिंदू परिषदेच्या *हिंदू हितचिंतक अभियानाचा* वेंगुर्लेत शुभारंभ
विश्व हिंदू परिषदेच्या हिंदू हितचिंतक अभियानाचा शुभारंभ ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या शुभहस्ते विठ्ठल मंदिर , वेंगुर्ले येथे वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत करण्यात आला. यावेळी श्री.देव रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र परब यांच्या हस्ते सावळाराम कुर्ले बुवांचा पंढरपुरची अखंड वारी करीत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला .
संपूर्ण देशभर विश्व हिंदू परिषदेने ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत ” *हिंदू हितचिंतक अभियान* ” आयोजित केले आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यांमध्ये वारकरी संप्रदायाच्या मंडळी सोबत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंढरपुरची कार्तिकी वारी करुन आलेल्या वारकरयांचा सन्मान विश्व हिंदू परिषद , प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला .
विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णु खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली . तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे सांगितले . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर गुरुजींनी हिंदुंनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषदेच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले .
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे वेंगुर्ले प्रखंड प्रमुख अरुण गोगटे , प्रखंड मंत्री आप्पा धोंड , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक बाबुराव खवणेकर सर , कार्यवाह मंदारजी बागलकर , बजरंग दलाचे भुषण पेठे , भाजपचे शरदजी चव्हाण , प्रसंन्ना देसाई , वि. ही.प.चे महादेव ( भाऊ ) केरकर, महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर , रा.स्व.संघाचे विजय वाडकर , *हिंदुधर्माभिमानी* — स्मिता मांजरेकर , मृण्मयी केरकर , प्रीती चव्हाण , शालीनी चीपकर , स्वप्नाली धोंड , ओंकार चव्हाण , *वारकरी संप्रदायाचे* —- किशोर रेवणकर , गजानन कुबल , दिगंबर कुबल , रघुवीर पेडणेकर , रमाबाई तांडेल , शारदा तांडेल , प्रमीला टाककर , सहदेव गिरप, दिपाली कुबल, चित्रा केरकर , देवयानी केरकर , दाजी सावंत , सहदेव गिरप , सुजाता भुते , सावित्री तारी , अश्विनी गिरप , सुगंधा बांदेकर , चंदन कुर्ले , पांडुरंग मोंडकर , शामसुंदर रेवणकर , विठ्ठल वेंगुर्लेकर , अपर्णा सातार्डेकर , चंद्रभागा मेस्त्री , संध्या भोगवेकर , शाम आरोलकर , अंकुश वराडकर , दुर्गा कुबल , लक्ष्मी तांडेल , बाबली राऊळ , शुभांगी केळुसकर इत्यादी उपस्थित होते.