सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.५ वी व ८ वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्र.सचिव माणिक बागर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी दिली आहे.
ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे. शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्याचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे. वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व ८ वी. साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.