तात्काळ सेवा सुरू करा; अन्यथा लोक वर्गणीतून दुरुस्त करू, देव्या सुर्याजी…
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसीस सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील रूग्णांची गैरसोय होत आहे. दररोज डायलेसीससाठी रूग्ण हे ग्रामीण भागातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, डायलेसीस मशीन बंद असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने ही मशीन दुरुस्त करून सेवा सुरळीत न केल्यास युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून ही मशीन दुरुस्त करून दिली जाईल, अशी माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली.