नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रशासनाकडे करणार मागणी…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रशासनाकडे करणार मागणी…

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची माहिती

सावंतवाडी

कोरोना आजाराचा संकटातून सावरत असताना परतीच्या पावसाचे संकट उभे राहिले असून संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना देखील हा फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी प्रशासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा