संजय राऊतांच्या जामीनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीची याचिका विशेष सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
त्यामुळे संजय राऊत यांची आजच सुटका होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये संजय राऊत यांना आज जामीन मिळाला आहे.
संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध दर्शवत त्याला स्थगिती देण्यात यावी अशी एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता यावर सुनावणी करत विशेष सत्र न्यायालयाने ही स्थगिती द्यायला नकार दिला आणि संजय राऊतांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला.
दोेन लाखांच्या कॅश बॉंडवर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची सुटका करण्यात आली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता ईडी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ साडे चार वाजेपर्यंत आहे. पण ईडीची ही याचिका तातडीने उच्च न्यायालयात घेतली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.