You are currently viewing गुळदुवे मठात पौरोहित्य तुलसी विवाह

गुळदुवे मठात पौरोहित्य तुलसी विवाह

सावंतवाडी :

महिला पुरोहितांद्वारे परंधाम गुळदुवे मठात प्रशिक्षित महिला पुरोहितांद्वारे पौरोहित्य तुलसी विवाह संपन्न झाला.
मातृशक्तिद्वारे पौरोहित्य व्हावे ही दिव्य संकल्पना पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी समाजात सुरू केली. आज हिंदू समाज ज्ञानाने व संस्काराने मंडित व्हावा, धर्माविषयीच ज्ञान प्राप्त करून स्वतः संस्काराने मंडित होऊन जीवन आनंदमय बनवावे यासाठी आपल्या संस्कृतीची जोपासना करणे हे खूप महत्त्वाचं आहे. प्रशिक्षित महिलांनी पौरोहित्य करून मातृशक्ति धर्माचरण करण्यासाठी अग्रेसर आहेत हे दाखवून दिले आहे असे प्रतिपादन क्षेत्रिय प्रमुख उपाध्याय सुधाकरजी यांनी केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने राजाधिराज सद्गुरु सदानंदाचार्य स्वामीजी समाधी स्थान, श्री क्षेत्र परंधाम गुळदुवे – सावंतवाडी महाराष्ट्र येथे प्रशिक्षित महिला पुरोहितांच्या पौरोहित्याखाली तुलसी विवाह सोहळा सुसंपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

पूज्य स्वामीजींच्या हर घर पुरोहित – स्वयं पुरोहित या दिव्य संकल्पनेतून गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकात हजारो प्रशिक्षित पुरोहित तयार झालेले आहेत. गेली अनेक वर्षांपासून गोवा राजभवन, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ, विविध महनीय मान्यवरांच्या घरोघरी तसेच गुरुपीठाच्या सर्व मठ, मंदिर व आश्रमात तुलसी विवाह सोहळा प्रशिक्षित पुरोहितांच्या पौरोहित्याखाली संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे परंधाम गुळदुवे मठात यजमान सौ. व श्री. शिवधन बागकर यांच्या यजमानपदाखाली तुलसी विवाह सुसंपन्न झाला.

या सोहळ्यास संत समाज – गुळदुवे, मळेवाड, शिरोडा, तिरोडा या भागातील शिष्यगण तसेच भाविक उपस्थित होते.

याप्रसंगी क्षेत्रीय प्रमुख उद्योजक प्रकाश राऊत, संत समाज गुळदुवे अध्यक्ष उल्हास गावडे, संत समाज मळेवाड अध्यक्ष दाजी सावळ आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा