You are currently viewing शेतकरी कायदा मान्य आहे की,अमान्य ते सांगा -माजी आमदार प्रमोद जठार…..

शेतकरी कायदा मान्य आहे की,अमान्य ते सांगा -माजी आमदार प्रमोद जठार…..

ठाकरे सरकार ची भूमिका ही दुटप्पीपणाची…

देवगड
“शेतकरी विधायक कायदा मान्य आहे की अमान्य हे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बिळातून बाहेर येऊन जाहीर करावे “राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मकथा पुस्तकात एक चेहरा प्रत्येक्ष सत्तेत आल्यावर वेगळा चेहरा असल्याचा टोला यावेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला…..
पोटात एक आणि ओठात एक अशी या महाविकास आघाडी सरकारची त-हा आहे.  कारण या सरकारचे भाग्य विधाते  शरद पवार हे या देशाचे दोन वेळा कृषी मंत्री होते. मग कुठचा ही शेतकरी आपला शेतमाल कुठे ही विकू शकतो पण शरद पवार आपल्या आत्मचरित्र पुस्तकात म्हणतात की शेतमाल हा apmc मार्केट ला का विकला जावा? असं दोन्ही बाजूने बोलणार हे।सरकार शेतकऱ्यांच्या भल्याच नाही या कायद्यावर ठाकरे सरकार ने स्थगिती आणली आहे, म्हणजे सरकार ची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे म्हणजे च शेतकऱ्या च हे सरकार नाही अशी यावेळी ठाकरे सरकार वर माजी आमदार प्रमोद जठार यांनी टीका केली आहे ते देवगड येथे पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा