You are currently viewing २० नोव्हेंबरला कणकवलीत १ दिवस छोट्यांचा खाऊगल्ली कार्यक्रम

२० नोव्हेंबरला कणकवलीत १ दिवस छोट्यांचा खाऊगल्ली कार्यक्रम

कणकवली :

 

कणकवली गणपतीसाना येथे समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने २० नोव्हेंबरला एक दिवस छोट्यांचा खाऊगल्ली कार्यक्रम सायंकाळी ५ ते ११ वाजता या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमात गायक सौरभ दप्तरदार, गायिका तृप्ती दामले, कॉमेडियन विजय नायर (गोवा) बोलक्या बाहुल्या व जादूगर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुचित्रा कुंभार आपली कला सादर करणार आहेत.

या कार्यक्रमाचा शुभारंभ आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली येथील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक अभिजीत मुसळे, अजय गांगण आदी उपस्थित होते.एक दिवस लहान छोट्यांचा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो तसाच यावर्षी देखील आयोजित करण्यात आला आहे. खाऊगल्ली कार्यक्रमात झोपाळे, पाळणे, घसरगुंडी, मुलांचे खेळ असणारे सर्व खेळ असणार आहेत. तसेच सेल्पी पॉइंट चे विशेष आकर्षण देखील पालक व मुलांसाठी असणार आहे. पिझ्झा, पाणीपुरी, भेलपुरी, शोरमा, चायनीज, तंदूर, चिकन ६५, स्नॅक्स, आईस्क्रिम, कोल्ड्रींक्स आणि बरेच काही खाण्यासाठी असे खाण्याचे स्टॉल लावले जातील. त्यासाठी कणकवली शहरातील महिला बचतगटांना प्राधान्य असणार आहे. स्टॉल सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आले आहेत. स्टॉलसाठी ८ बाय १० ची जागा दिली जाणार. कणकवली शहरातील मुलांसाठी समीर नलावडे मित्रमंडळ यांच्याकडून ५० रुपयांचे कूपन दिले जाणार आहे,असेही समीर नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा