जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक कणकवली यांना निवेदन सादर
कणकवली
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मंत्रिमंडळातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसद रत्न प्राप्त मा.सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अश्लील टीका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे एका संविधानिक घटनेनुसार राज्यमंत्री मंडळात मंत्रिपदावर असणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ते शोभादायक नाही. सदर घटना ही लोकशाही प्रधान देशात भूषणावह नाही.
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे निषेध आंदोलने होत आहेत. तसेच अशा बेजबाबदार मंत्र्याची राज्यमंत्री मंडळातून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेली आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात येत आहे. त्याप्रमाणे त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे ठाणे अंमलदार कणकवली यांना सादर केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर. प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, संतोष चव्हाण, उत्तम तेली, जयेश परब, राजू सुतार, पवन ताईशेटे, बाळ मसुरकर, समीर चव्हाण आदी कणकवली राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते.