You are currently viewing भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार

भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने कोकणात सांस्कृतिक चळवळ निर्माण करणार

*अक्षया चितळे , कोकण विभाग संयोजक सांस्कृतिक आघाडी*

वेंगुर्ला :

 

कोकण भुमी ही कलाकारांची खाण आहे. कोकणातील कलाकारांनी देशात नव्हे तर जगात अटकेपार झेंडा रोवला आहे. कोकणचा सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने सांस्कृतीक चळवळ उभी करणार असल्याचे कोकण विभागाच्या सांस्कृतिक आघाडीच्या संयोजीका अक्षया चितळे नी सांगितले.

दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या अक्षया चितळे यांनी वेंगुर्ले तालुका कार्यालयात भेट दिली. त्यावेळी भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी सांस्कृतिक आघाडीच्या मुग्धा भट – सामंत ह्या उपस्थित होत्या. यावेळी सांस्कृतिक आघाडी सिंधुदुर्गचे संयोजक बाळ पुराणीक, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके यांनी सिंधुदुर्गातील सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककला असलेली *दशावतार* व ही कला जिवंत ठेवलेली दशावतार मंडळे यांना राज्य सरकार कडून भरीव मदत मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी भाजपा साऺस्कॄतीक आघाडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुणगट्टीवार यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया चितळे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल, महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक नागेश गावडे, नगरसेवीका साक्षी पेडणेकर – कृपा मोंडकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व दिपक नाईक, सांस्कृतिक आघाडी ता.अध्यक्ष शैलेश जामदार, शक्ती केंद्र प्रमुख नितीन चव्हाण, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, रंगकर्मी रमेश नार्वेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व दशरथ गडेकर व पींटु सावंत, महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसीका मठकर, वारकरी संप्रदायाचे दिवाकर कुर्लेे, आनंद उर्फ बीट्टु गावडे, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर – नितीश कुडतरकर, प्रथमेश सावंत, विश्वनाथ परब, गोविंद परब इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा