*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे दिवंगत सदस्य अरविंदजी ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साकव्य*
घेतला होता वसा जन मेळवू कांही तरी
शब्द सूर नी भावनांचे पंख लेवू अंतरी
घडवूया कांही विकासा स्वप्न राहूद्या उरी
एकमेका साथ देऊ प्रतिसाद घुमूदे अंबरी
जीवनी या झेलली किरणे उन्हाचीही जरी
आज वाटे धन्यता येती पहा श्रावण सरी
उत्साह वाटे उत्सवी पाहून येई चंद्रशिखरी
संजीवनी लाभे कुणा कोणी विलासी विहरी
पांडुरंगाची कुणाला भासे इथेही पायरी
रचती कुणी अभंगाही जणू चंद्रभागेच्या तीरी
ज्ञानगंगा, काव्य जमुना, जेथ संगम या परी
साकव्य नावे समूह याची कीर्ती हो दिगन्तरी
अरविंद
14/8/21