*भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती (महाराष्ट्र राज्य) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*
*पोखरलेले*
पूर्वज सांगून गेले “” चिंता जीवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते “” म्हंजे लोकांच्या मनातील चिंता हेच कारणं लोकांना कमकुवत करण्यास कारणीभूत आहे.
आज सर्वच क्षेत्रातील वाढती समस्या त्यामध्ये सामाजिक असुरक्षितता. शैक्षणिक असुरक्षित. वैद्यकीय असुरक्षित. आर्थिक असुरक्षित. शासकीय निमशासकीय योजनांची असुरक्षित. भरती साठी मुलं असुरक्षित.वाढती महागाई. एजंट दलाल यांची लुट. वाहतूक लुट. बेरोजगारी. विविध संघटना दबाव. शेतकरी मालाच्या दरात तफावत. बांधकाम कामगार हाताला काम नाही म्हणून असुरक्षित. राजकीय दबाव. घरपट्टी पाणीपट्टी लाईट बील याची चिंता. मुली मुलांच्या लग्न नोकरी चिंता. सरकार आडमुठी धोरण. भरती वयाची वाढता कालावधी यामुळे तरुण अडचणीत. पेट्रोल डिझेल घरगुती गॅस वाढते दर यांची चिंता. शैक्षणिक पुस्तकाचे वाढते मनमानी दर. लाच भ्रष्टाचार याच जाळ. शाळेत दाखल होण्यासाठी लागणारी लाच. प्राथमिक शाळा यांना लागला सुरुंग. रस्ते गटारे समाजमंदिर दिवाबत्ती वृक्षलागवड. यामध्ये भ्रष्टाचार. ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका घरकुल विविध योजना घोटाळा. सरपंच उपसरपंच नगरसेवक सदस्य यांचा लोकांवर दबाव. वाढती गुंडगिरी दहशतवाद लुटमार बलात्कार अपहरण खून यांचें वाढते प्रमाण. जागोजागी भुखंड घोटाळा घरकुल घोटाळा नोकरी भरती घोटाळा चारा घोटाळा धरण कालवे बंधारे पूल बांधणी घोटाळा. महिला असुरक्षित. महसूल घोटाळा. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे होणारा त्रास. पुरवठा विभाग निकृष्ट अन्न धान्य वाटप . परकीय लोकाचा वाढता लोंढा. बॅंक पतसंस्था सहकारी आर्थिक संस्था याची लुट. बौध्दिक लुट. अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती दुजा भाव . सामाजिक लुट. सांस्कृतिक लुट. वनविभाग घोटाळा. बांधकाम विभाग घोटाळा. पाणीपुरवठा घोटाळा. जलसंपदा विभाग. घोटाळा. अश्या विविध माध्यमातून रोज लाखों करोडो रूपयांचा घोटाळा आपण वाचतो दुरध्वनी वर ऐकतो आणि थोडी काहोईना आपली मानसिकता कुचंबणा होतें कारणं या सर्व क्षेत्राशी आपला काहींना काही तरी संबंध आहे . म्हंजे आपण या सर्व व्यवस्थेचा एक हिस्सा आहे. यामुळे आपल्यातील प्रत्येक जण आज मग तो सर्वसामान्य गोरगरीब लोक महिला शिकणारी मुले हे सर्वजण त्यांच्या परिस्थितीनुसार तणावात आहे त्यामुळे वरन हसणारी लोक आनंदी असल्याचे ढोंग करणारी लोकं आतून कुचमली आहेत . म्हंजे लाकडाला लागलेला भुंगा आपणांस दिसतं नाही कारणं लाकूड वरून चांगलं असतं आणि आतून पूर्ण पोखरलेले असतं अशी परिस्थिती आज आपल्या सर्वांची झाली आहे. आणि या मानसिक तणावाचा आपल्या शरीर आणि मनावर विपरीत परिणाम होत आहे.
तणाव हा मानसिक स्थितीमुळे होणारा विकार आहे. मानसिक स्थिती आणि परिस्थिती यांच्यातील असमतोल आणि असंतुलनामुळे तणाव निर्माण होतो. तणाव हा एक संघर्ष आहे, ज्यामुळे मनात आणि भावनांमध्ये खोल दरी निर्माण होते. तणाव हे इतर अनेक विकारांचे प्रवेशद्वार आहे. यामुळे मन अस्वस्थ होते, भावना अस्थिर होते आणि शरीर अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या प्रवासात व्यत्यय येतो.
तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात. बाह्य कारणे व आंतरिक कारणे
बाह्य – एकूण तणावनिर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ ५-१० टक्के एवढाच वाटा असतो.
उदा. कामाच्या ठिकाणचे व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.
आंतरिक – एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा ९०-९५ टक्के वाटा असतो. आक जीवन प्रणालीमुळे तणाव निर्माण होतो असे म्हटले जाते; परंतु कोणतीही परिस्थिती ही स्वतः तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरूप त्या परिस्थितीकडे पहाण्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर सर्व अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे नेहमीची परिस्थितीदेखील कशी तणाव निर्माण करू शकते, याची काही उदाहरणे खाली आहेत.
आत्मविश्वासाचा अभाव – आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली, की व्यक्ती
तणावग्रस्त होते.
हळवेपणा – रस्त्यात भेटलेला मित्र बघून हसला नाही म्हणून तणाव.
लाजणे – अपरिचित व्यक्तीशी बोलताना तणाव.
न्यूनगंड असणे – आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात तणाव.
तणावाच्या दुष्परिणामांची दोन गटात विभागणी करता येते.
शारीरिक – पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.
मानसिक – लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.
शारीरिक स्तरावर उपाय – उदा. झोपी जाणे, कामावरून सुट्टी घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, व्यायाम करणे इत्यादी. यात केवळ कृतीच्या स्तरावर उपाय असल्यामुळे सुधारणा अगदी तात्पुरतीच असते. बऱ्याच वेळा तणावपूर्ण परिस्थितीपासून पूर्णतः बाजूला जाणे शक्य नसते, तसेच एका ठिकाणावरून दुसरीकडे गेल्यास तिथेही ताण निर्माण होऊ शकतो.
मानसिक स्तरावर उपाय – मानसोपचार उपचार इत्यादी. यात केवळ कृतींच्या स्तरावरच नव्हे तर ज्यापासून कृतींचा उगम होतो त्या विचारांच्या स्तरावर उपचार केले जातात. त्यामुळे काही काळ सुधारणा टिकू शकते म्हणून हे उपाय हे कायम स्वरूपी उपाय नाहीत.आणि हॅन्स सेली यांनी तणावाच्या अभ्यासासाठी प्रारंभिक वैज्ञानिक आधार स्थापित करण्यासाठी प्राण्यांचा अभ्यास केला. त्यांनी उष्णता आणि सर्दी, दीर्घकाळ थांबणे आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया यासारख्या बाह्य ताणांवर प्राण्यांच्या शारीरिक प्रतिक्रियांचे मोजमाप केले आणि हे अभ्यास मानवी प्राण्यांपर्यंत वाढवले.
मानवांमधील तणावाच्या पाठपुराव्याच्या अभ्यासानंतर, रिचर्ड रेह आणि इतरांनी असे मानले आहे की तणावाची कारणे स्वतंत्रपणे वर्गीकृत केली जाऊ शकतात, जीवनातील तणावाची तीव्रता आणि जीवनातील ताणतणाव निर्मितीच्या सरासरी प्रमाणानुसार (विशेषत: होम्स आणि रेह ). ताण स्केल . पासून). अशाप्रकारे, गृहीतक असे होते की तणाव हा पारंपारिकपणे त्यांच्यासाठी बाह्य अपमानाचा परिणाम आहे ज्यांच्यासाठी तणावाचा अनुभव नियंत्रणाबाहेर आहे. अगदी अलीकडे, जसे की परिस्थिती असेल, असा युक्तिवाद केला गेला आहे की कोणत्याही आंतरिक क्षमतेमध्ये बाह्य परिस्थितीमुळे तणाव निर्माण होत नाही, परंतु प्रभावित व्यक्ती त्यांच्या स्वत: च्या विचार, क्षमता आणि समजूतदारपणाने कसे मध्यस्थी करतात.
आज बाजारात माल खरेदी करत असताना वाढत्या महागाईमुळे लोकांच्या मनावर तणाव आहे. वाढती बेरोजगारी असल्यामुळे तरुण वर्ग तणावात आहे. रोज सकाळी पहाटे पासून भरतीच्या आशेवर व्यायाम करणारी मुले सरकार वेळोवेळी भरती मध्ये व अभ्यासक्रमात करत असलेल्या बदलामुळे मानसिक तणावात आहेत. घराची परस्थिती बेताची आपल्याला काम नाही त्यामुळे हातात पैसा नाही यामुळे सकाळी काॅलेज आणि दुपारी हमाली करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणारी मुलं सुध्दा आहेत पण सरकारला काय यांची किव आहे कां याचा मानसिक तणाव आज मुलांच्या मनावर आहे. त्यातूनच व्यसनाधीनता. गुंडगिरी. अवैध धंदे. यांना उत आला आहे म्हंजे सरकारला सर्व तरूण वर्ग गुन्हेगार तयार करायचा आहे कां?? असा मानसिक तणाव पालकांच्या व मुलांच्या मनावर आहे. सरकारने भरतीची वयोमर्यादा वाढवली मुलांच्यात आनंदाचे वातावरण आले पण वयाची तीस वर्ष जर भरतीसाठी जात असतील तर पालकांनी नोकरीची वाट बघायची म्हंजे मुलांचे लग्नाचे वय वाढलं आणि आत्ता या मुलांना मुली मिळणारं कां?? म्हणजे सरकार लोकसंख्या कमी करायचं षडयंत्र करतं कां??
बांधकाम कामगार नोंदणी हे आज सर्वात मोठं आर्थिक गोळा करण्याचे साधन झाले आहे. ज्यांना काही मुद्दे नाहीत असे राजकीय सामाजिक नेते खासदार आमदार मंत्री नेते समाजसेवक विविध स़घटना सेवाभावी संस्था. युनियन आपल्या बगलबच्चे सह बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला लुटण्यासाठी आपला जबडा फासटून बसले आहेत. आणि कोणाला विचारणा करायची सत्ता यांची सरकार यांची यामुळे आपली लुट होत आहे हे बघून सुध्दा बांधकाम कामगार आज सर्वांच्या दाबाखाली मानसिक तणावात वावरत आहेत.
माणूस आहे म्हंजे आजारी पडणार आणि त्याला उपचारासाठी डॉ यांचेकडे जाण्याची गरज आहे. आत्ता सर्वात मोठ बोगस आणि आर्थिक लुट करण्याचे मार्ग म्हणजे दवाखाने आणि देवस्थान कारणं येथे कोणतीही किंमत ठरविली जात नाही. दवाखान्यात गेल्यावर रुग्ण हक्काची सनद नाही. उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही. औषधांच्या किंमती निश्चित नाहीत. आजाराप्रमाणे उपचार दर निश्चित नाही. दवाखान्यात पेशंटला व नातेवाईक यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. दवाखान्यात महात्मा फुले जीवनदायी योजना. राजीव गांधी जीवनदायी योजना. पंतप्रधान आयुष्मान योजना. अशा योजनाची माहिती दिली जात नाही. योजनांची माहिती देणारे समन्वयक उपस्थित नाहीत. दवाखान्यात बीलासाठी मयत पेशंट प्रेत अडवून ठेवले जाते. मेडिकल आणि डॉ यांचे कमिशन ठरलेले असते . आगोदर पैसा मगच उपचार असा डॉ यांचा फंडा आहे. आज शिकाऊ आणि फसवे डॉ यांना गल्ली बोळात उत आला आहे. अशा विविध बाबींमुळे गोरगरीब लोकांना तणावात वावरावं लागतं आहे.
लोकांना स्वच्छ निवडक अन्न धान्य स्वस्त आणि रास्त दरात मिळावे यासाठी पुरवठा नागरी सनद तयार करण्यात आली आहे. आज ज्यांना गरज आहे त्यांना रेशन अन्न धान्य मिळत नाही. जे लोक रेशन अन्न धान्य जनावरांना घालतात त्यांना पोतयान रेशन धान्य मिळत आहे. खरोखरच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन अन्न धान्य मिळतच नाही. शिधापत्रिका तपासणी पडताळणी मोहीम वार्यावर गेली. परवाची सप्टेंबर महिन्यात शिधापत्रिका सरेंडर करण्यासाठी शासनाने आव्हान केले होते ती सुध्दा मोहीम म्हणावी तशी सफल झाली नाही. आणि आत्ताची आधार कार्ड सिडिंग करायची मोहीम किती सफल होईल हे माहीत नाही . या सर्व प्रकाराने सर्वसामान्य गोरगरीब लोक मानसिक तणावात आहेत .
माहिती अधिकार सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात चालणारे सर्व कामकाज जाणून घेण्याचा आपणांस अधिकार २००५ साली माहिती अधिकार कायद्याने मिळाला आहे. पण आज सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात आमचें सहकारी माहिती अधिकार दाखल करतात पण त्यांना आपल्या मागणीप्रमाणे उत्तर मिळत नाही. पळवाट काढून माहिती अधिकार कार्यकर्ते यांना मानसिक त्रास दिला जात आहे. यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते यांना तणावात दबावातून वावरावे लागतं आहे.
तरुण वर्गाला व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाने वर्गवारी नुसार आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत. आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. डॉ बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ. व ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका पालिका यांचेकडून दारिद्र्य रेषेखालील लोकांना मिळणारे आर्थिक सहाय्य योजना. हे सर्व कागदावरच आहे. तरुणांना व्यावसायिक कर्ज मंडळाकडून मंजूर केलं जातं पण हेलपाटे मारुन सुध्दा टक्केवारी शिवाय बॅका कर्ज देत नाहीत. बॅंक अधिकारी व कर्मचारी हे कर्जदार यांना मानसिक त्रास देत आहेत त्यामुळे आज सर्व तरूण वर्ग आपला वेळ आणि पैसा वाया गेला यामुळे तणावात आहेत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859


