अळवाचं पान….

अळवाचं पान….

अळवाच्या पानावरच्या,
थेंबासारखी…
असतात आजकाल नाती.
काही काळच टिकतात,
नात्याची चमक दाखवतात,
मोत्यांसारखी मिरवतात…
आणि,
आपल्याही नकळत,
अळवाच्या पानावरील,
थेंबासारखीच…
क्षणात घरंगळुन पडतात.
त्यात चूक ती कोणाची?

अळवाच्या पानावरच्या थेंबाला..
मोती समजून बसलो..
आणि,
तिथेच मी चुकलो.
कधीतरी कळून चुकते,
ना मिळाले ते मोती,,
न काहीच राहिले हाती.
मोत्यांच्या आठवणीने,
नेत्र माझे ओलावले…
प्रेमाने भारलेले आपले,
हृदय मात्र हेलावले…
उगाचच…

(दीपी)
दीपक पटेकर
#८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा