सावंतवाडी
तळवडे बाजारपेठेत खरेदीसाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे आकस्मिक निधन झाले. अजित पुंडलिक जाधव (रा. तळवडे-जाधववाडी), असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. ते एका कोल्ड्रिंक्समध्ये बसले होते. यावेळी त्यांना चक्कर येऊन ते जमीनीवर कोसळले. तेथील नागरिकांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत चुलत भाऊ अनिल मोहन जाधव यांनी दिलेल्या खबरी नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.