महेश तावडे व श्री साई स्पोर्ट्सच्या प्रयत्नांना अखेर यश
संवाद मीडियाने देखील उठवला होता आवाज
मुंबई येथील दहीहंडी उत्सवात मृत्युमुखी पडलेल्या
दत्तप्रसाद चाळ, कोंढाळकर कंपाऊंड ,रामनगर भांडुप पश्चिम येथील प्रथमेश तुकाराम परब वय (वर्ष 26) मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेवाळे गावचा हा तरुण गोपाळकाला उत्सवात 16 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 11:15 च्या दरम्यान नरदास नगर येथील प्रगती विद्यामंदिरच्या पटांगणावर श्री साई स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गोविंदा पथकाचा सराव सुरू असताना जखमी झाला होता.
त्यानंतर उपचार चालू असताना 11 सप्टेंबर 2022 रोजी प्रथमेशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत प्रथमेश परबच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री. महेश जयप्रकाश तावडे सर, पत्रकार किशोर गावडे व श्री साई स्पोर्ट्सने सातत्याने प्रयत्न केले होते. कोकणातील पहिले दै.कोकणसाद ने देखील हा प्रश्न लावून धरला होता. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयाची मदत मिळावी ,यासाठी महेश जयप्रकाश तावडे सर, किशोर गावडे, प्रशिक्षक शैलेश जागडे, दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पडेलकर, दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता तळावडेकर झगडे, मुलुंड कुर्ला तहसीलदार डॉक्टर संदीप थोरात, तलाठी अमित पाटील, कोकणातील पहिले दै.कोकणसाद, संवाद मीडिया यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने प्रथमेशचे वडील तुकाराम सहदेव परब यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांचा धनादेश 3 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य सरकारने गोविंदा उत्सवात अपघाती मृत्यू आलेल्या गोविंदाला दहा लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार राज्य सरकारकडून मृत तरुणांच्या वडिलांच्या नावे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांच्या हस्ते मदत निधी त्यांच्या वडिलांना देण्यात आला.