You are currently viewing प्रीत तुझी माझी

प्रीत तुझी माझी

*”काव्य निनाद साहित्य मंच सदस्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”प्रीत तुझी माझी*

*”प्रीत तुझी माझी*
जी राधा कृष्णाची,
चंद्र चांदण्यांची,
फुलं….सुगंधाची…..

*”प्रीत तुझी माझी*
शब्द…अक्षरांची,
सुर……गायनाची,
गंध……चंदनाशी…..

*”प्रीत तूझी माझी*
जी परमात्म्याशी,
श्वास नी प्राणाशी,
नि:स्वार्थी जीवाशी…

*”प्रीत तुझी माझी*
‌ *”कृष्ण बासुरीची*
*”जल सागराची*
*”नभ आकाशाशी*

*”प्रीत तुझी माझी*
*”अनोखी नवखी*
*”खाण आनंदाची*
*”साद भावनांची*

*”सौ योगिनी वसंत पैठणकर*. नाशिक.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा