भाजपा नेते, माजी खा. निलेश राणे यांनी वेधले जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे लक्ष
मालवण
सर्वर डाऊन असल्याने रेशन धान्य वितारण करण्यात मागील ऑक्टोबर महिन्यात मोठी समस्या निर्माण झाली. महिना संपला तरी अनेक ग्राहकांना धान्य मिळाले नाही. याबाबत ग्राहकांनी माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले असता निलेश राणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सर्वर डाऊन ही तांत्रिक समस्या असून अनेक ग्राहकांना रेशन मिळाले नाही. तरी सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होऊ नये याचा विचार करून मागील महिन्यात ज्यांना धान्य मिळाले नाही. त्यांना या महिन्यात मागील महिन्याचे धान्य ऑनलाइन पद्धतीने मिळावे. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा. अशी भूमिका निलेश राणे यांनी मांडली. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी दिली आहे