You are currently viewing सावंतवाडीत होणार्‍या नॅबच्या नेत्र रुग्णालयाला दोन लाखाची मदत…

सावंतवाडीत होणार्‍या नॅबच्या नेत्र रुग्णालयाला दोन लाखाची मदत…

फेडरल बँकेचा पुढाकार; लवकरच रुग्णालय कार्यान्वित करू, अनंत उचगावकर…

सावंतवाडी

नॅब संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडी येथील भटवाडी भागात उभारण्यात येणार्‍या नेत्र रुग्णालयाचा फेडरल बँकेकडुन सोलर सिस्टीम बसविण्यासाठी दोन लाखाची मदत देण्यात आली आहे. या रुग्णलयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी दिली. दरम्यान नुकताच हा धनादेश नॅबच्या पदाधिकार्‍यांकडे देण्यात आला.

यावेळी बँकेचे अधिकारी सुनिल नाईक, सावंतवाडी शाखा अधिकारी योगेश सावंत यांच्यासह नॅबचे कोषाध्यक्ष भालचंद्र उर्फ आबा कशाळीकर, स्नेहच्या मुख्याधिकारी संगिता प्रभू आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा