You are currently viewing उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी कणकवलीत नितेश राणे यांची घेतली भेट..

उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी कणकवलीत नितेश राणे यांची घेतली भेट..

शेतकऱ्यांना आवश्यक निधीची पूर्तता शासनाकडून तातडीने केली जाईल, मात्र शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वितरणात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नका – आ. नितेश राणे

 

कणकवली :

उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी आज कणकवली येथे आम. नितेश राणे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांचे आ. नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेती-फळबागायती नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, आवश्यक निधीची पूर्तता शासनाकडून तातडीने केली जाईल, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरणात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नका,” अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांना दिल्या.

यावेळी आ. नितेश राणे यांनी गवा रेडे, माकडे व अन्य वन्य प्राण्यांमुळे शेती नुकसान संदर्भात उपवनसंरक्षक यांचे लक्ष वेधले. नुकसानीचे पंचनामे करण्यात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नका अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. शासन स्तरावरून आवश्यक लागणारी निधीची तरतूद केली जाईल. याकरिता शेतकऱ्यांना निधी कमी पडणार नाही. परंतु तातडीने उपाययोजना करण्यात कोणतीही कसूर होता कामा नये, असे आ. नितेश राणे यांनी सांगितले. तसेच लोकवस्तीत बिबट्याच्या वाढलेल्या वावराच्या संदर्भात देखील वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आ. नितेश राणे यांनी दिल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवलकिशोर रेड्डी हे उपवनसंरक्षक पदी रुजू झाल्याने आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. ही जागा रिक्त होती ती भरण्याची मागणी आ. नितेश राणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा