You are currently viewing दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा संयोजक पदी निवड

दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा संयोजक पदी निवड

दोडामार्ग :

 

भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा संयोजक पदी भाजपचे युवा नेतृत्व तथा दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांची निवड झाली असून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कसई- दोडामार्ग नगरपंचायत एकहाती निवडून आणल्या नंतर भाजपशी एकनिष्ठ असलेल्या चव्हाण यांची भाजपमध्ये ताकद अधोरेखित झाली होती.

चेतन चव्हाण यांच्यावर वरिष्ठांनी आता युवा मोर्चा जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी सोपविली आहे. दोडामार्ग शहरात भाजपला बळकट करण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे चेतन चव्हाण व त्यांच्या टीमचा मोठा वाटा होता. आता युवा मोर्चा संघटन साठी जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्याने चेतन चव्हाण नक्कीच येथही आपला मोहोर उमटवतील,अशी चर्चा त्यांच्या मित्रमंडळात सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा