You are currently viewing सावंतवाडीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ

सावंतवाडी

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयोजनाने कळसूलकर इंग्लिश स्कूलच्या मैदानात शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आज आयोजन करण्यात आले. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अभिनव फाऊंडेशनच्यावतीन लखमराजेंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना युवराजांनी मार्गदर्शन केले‌. स्वसंरक्षणासाठी आणि शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
यावेळी प्रशिक्षक वस्ताद प्रमोद पाटील,अभिनव फाऊंडेशनचे सेक्रेटरी डॉ.प्रसाद नार्वेकर,अण्णा म्हापसेकर,गौरांग चिटणीस,सौ.राजश्री टिपणीस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा