ग्रामपंचायत निवडणुकांबाबत आमदार राणेंची ग्रामविकास मंत्र्यांसोबत चर्चा
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार नितेश राणे यांनी नुकतीच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायत सर्वत्रिक निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने या निवडणुकीच्या बाबत श्री. राणे यांनी गिरीश महाजन यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह अन्य उपस्थित होते.