दोडामार्ग :
साटेली -भेटशी येथील श्री परमपूज्य सद्गुरु समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिराचा सहावा वर्धापन दिन व श्री परमपूज्य विनायक (अण्णा) महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, राजेंद्र म्हापसेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिंद्र कुडकर, अरविंद कदम, दादा देसाई उपस्थित होते.
मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच मंडपही घालण्यात आले आहेत. कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ट्रस्टतर्फे सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार १ नोव्हेंबर ते गुरुवार ३ नोव्हेंबर पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता पिंगुळी येथे महाप्रसाद, दुपारी २ वाजता श्री परमपूज्य विनायक अण्णा महाराज मूर्ती मिरवणूक श्री परमपूज्य राऊळ महाराज समाधीस्थानावरून मार्गस्थ होऊन साटेली -भेटशी येथील स्मारक मंदिर, नंतर तेथील ग्रामदैवत, बाजारपेठ ते पुन्हा स्मारक मंदिर अशी होणार आहेे. दुपारी ३.३० वाजता श्री दामोदर बोडगेश्वर दिंडी पथक वास्को गोवा यांचे आगमन, संध्याकाळी ७ वाजता सांज आरती ,७.३० वाजता डिचोली गोवा यांचे समईनृत्य, रात्री ८.३० वाजता पिकुळे येथील सिद्धिविनायक होणार आहे दशावतार नाट्य मंडळाचा कुंभमेळा हा नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. तर बुधवार २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, सकाळी 6 वाजता राऊळ महाराज पादुकांवर अभिषेक, ७ वाजता पूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती, महाप्रसाद २ वाजता राऊळ महाराज भक्त मंडळ मुंबई यांचे भजन, संध्या ४ वाजता हनुमान दामोदर प्रसादिक भजन मंडळ भेडशी यांचे भजन, संध्या ६.३० वाजता नामस्मरण व सांज आरती, रात्री ८ वाजता महाप्रसाद, तदनंतर भाऊ नाईक वेतोरे यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर १० वाजता मिमिक्री कलाकार अरुण गवंडळकर यांचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरती, ६ वाजता राऊळ महाराज पादुकांवर सार्वजनिक अभिषेक, ८.३६ वाजता श्री परमपूज्य सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महाआरती, दर्शन सोहळा, दुपारी १ वाजता अखंड महाप्रसाद, श्री दत्त संगीत भजनी मंडळ बच्चे सावर्डे, कोल्हापूर यांचे भजन, ३ वाजता दिंडी आगमन, डिचोली -गोवा यांचे सांस्कृतिक वनदिंडी कला, संध्या ६ वाजता. श्री परमपूज्य राऊळ महाराज महिला भजन मंडळ पिंगुळी यांचे भजन, सांज आरती ७ वाजता. पालखी मिरवणूक सोहळा, रात्री १० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचा ट्रिकसीनयुक्त्त माझे माहेर पंढरपूर नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष श्रीमती संगीता विनायक राऊळ( बाई माॅं) यांनी केले आहे.