दोडामार्ग
तपोभूमी कुंडई संचालित संत समाज दोडामार्ग यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत संस्कृत पाठशाळा वर्ग सुरू करावा अशी विनंती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना केली होती. त्यावर नगरपंचायत मासिक सभेत हा विषय घेण्यात आला व सर्वानुमते पिंपळेश्वर हॉल मध्ये दर शनिवारी हा वर्ग सुरू करण्यासंबधी सर्वानुमते मजुरी देण्यात आली. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली.
कसई दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात पिंपळेश्वर गणेशोत्सव मंडळ यांना विश्वासात घेवून व प्रशासकीय सर्व बाबी पूर्ण करुन लवकरात लवकर साप्ताहिक संस्कृत वर्ग सुरु करण्यात येईल . तरी सर्व विद्यार्थी / विद्यार्थीनींनी संस्कृत भाषा शिकण्याचा लाभ घ्यावा व सर्व पालकांनी सहकार्य करावे. इच्छुक विद्यार्थ्यांची नावे व त्यासोबत आधारकार्ड नगरपंचायत कसई – दोडामार्ग मध्ये देण्यात यावे, असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.
नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांची चर्चा झाली व सर्व विकासकामांना मंजुरी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली . त्याचप्रमाणे नगराध्यक्षांनी सर्व विकासकामांची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे आदेश दिले . या सभेस उपनगराध्यक्ष देविदास गवस , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर , शिक्षण व आरोग्य सभाप श्रीम.गौरी पार्सेकर , महिला व बालकल्याण सभापती श्रीम.ज्योती जाधव , महिला व बालकल्याण उपसभापती श्रीम.क्रांती जाधव तसेच नगरसेवक / नगरसेविका व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.