मालवण
येथील पालिकेकडे दारिद्र्य निर्मुलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव केला आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांग बांधवांनी १० नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले सादर करायचे आहेत. हे हयात दाखले मालवण भरड नाका येथील वायुसुत कम्युनिकेशन सेंटर मध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी दिली आहे.