*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना*
*”सीमा”*
मनुष्यानं सांभाळाव्या सीमा अंगभूत
कार्य करीत रहावे सदा आनंदात।।ध्रु।।
नदी सागराला असते सीमा मर्यादित
पशु ओरडती पक्षी गुंजती सीमित
सर्व ग्रहांना असते सीमा फिरती कक्षेत।।1।।
धरणाला असतात सीमा विवक्षित
सीमित उंची सांभाळती डोंगर पर्वत
जमिनीला असती चतु:सीमा सरहद्द।।2।।
खेळाचे मैदान असते आखीव सीमांकित
देशाच्या ठरलेल्या असती सीमा सरहद
वाहनाची गती सीमा हवी मर्यादित।।3।।
वागण्याला पाहिजे सीमा पाळावे संकेत
तुटेल असे ताणू नये असावे सीमित
आहाराला असावी मर्यादा सीमित।।4।।
सांभाळावी सीमा बोलणार्यांनं गाणाऱ्यानं
राग विस्ताराला हवी सीमा मर्यादित
सांभाळावी सीमा वाद्ये लावावी सुरांत।।5।।
विचारांना नसते सीमा ते अमर्याद
सकारात्मक रहावे यत्न करावे सतत
करावे सीमोल्लंघन मिळे ज्ञान अगाध।।6।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.