You are currently viewing ५ नोव्हेंबर रोजी १००% पुर्ण फेड केलेल्या विकास संस्थांच्या चेअरमन व सचिवांचा होणार सत्कार

५ नोव्हेंबर रोजी १००% पुर्ण फेड केलेल्या विकास संस्थांच्या चेअरमन व सचिवांचा होणार सत्कार

कणकवली :

 

कणकवली येथील श्री भगवती मंगल कार्यालय येथे शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. तालुक्यातील विकास संस्थांच्या सक्षमीकरणा बाबत सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ३० जून २०२२ अखेर वसूल पात्र बँक कर्जाची शंभर टक्के पूर्ण फेड केलेल्या प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, श्रीमती प्रज्ञा ढवण, सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत. तरी या चर्चासत्रास व सत्कार सोहळ्यास कणकवली तालुक्यातील सर्व विकास संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संस्था कमिटी सदस्य सचिव यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा