देवगड
मुंबई – मानखुर्द येथे मामाच्या घरी गेलेला गिर्ये बांदेवाडी येथील कु. सर्वेश सत्यविजय गावकर (१०) या शाळकरी मुलाचा घरातील विद्युत प्रवाहित तोरणांचा शॉक बसल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन दिवाळी सणातच ही घटना घडल्याने गावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गिर्ये, विजयदुर्ग परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.