You are currently viewing सांगवे ग्रामपंचायतीचा वतीने मोफत नेत्र तपासणी व चस्मा निवड कार्यक्रम संपन्न

सांगवे ग्रामपंचायतीचा वतीने मोफत नेत्र तपासणी व चस्मा निवड कार्यक्रम संपन्न

कणकवली

सांगवे ग्रामपंचायतीचा वतीने मोफत नेत्र तपासणी व चस्मा निवड करून द्यायचा ,लाभार्थीच्या इचछेनुसार मागेल ती फ्रेम असा अभूतपूर्व कार्यक्रम आज  दि. 29 रोजी माजी जी. प. अध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या  सावंत व जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी श्री.संदेश सावंत यांना आंतरराज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघा उभयतांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, त्यानंतर श्री.संदेश सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की यापुढे ग्रामपंचायत निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो आम्ही जिंकणारच व राज्यात तसेच देशात आमचे सरकार असून जे काय वरून सर्वसामान्य योजना येतील त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन उपसरपंच श्री. बाली सावंत यांनी केले व आभार ग्राम विस्तार अधिकारी श्री. ठाकूर यानी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा